News Flash

Kumbh Mela : कुंभमेळ्यावर लास वेगाससारखा हल्ला करु; आयसिसचा इशारा

१० मिनिटांची ध्वनीफित व्हायरल

संग्रहित छायाचित्र

Kumbh Mela कुंभमेळा, त्रिशूर पूरमवर हल्ले करण्याची धमकी आयसिसकडून देण्यात आली आहे. एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. भारतविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषादेखील यामध्ये करण्यात आली आहे. १० मिनिटांची ही ध्वनीफित मल्याळम भाषेतील आहे. कुंभमेळा, त्रिशूर पूरम उत्सवांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर या उत्सवांमध्ये घातपात घडवण्याचा इशारा आयसिसने दिला आहे.

आयसिसकडून जारी करण्यात आलेल्या १० मिनिटांच्या ध्वनीफितीमधील आवाज राशिद अब्दुल्लाचा असल्याचा सांगितले जात आहे. राशिद आयसिसच्या कासरगोड मॉड्युलचा सदस्य आहे. तो आयसिसमध्ये दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानला गेला होता. या ध्वनीफितीमध्ये कुरानचा उल्लेख करण्यात आला आहे. केरळमधील १०० जणांनी आयसिसमध्ये प्रवेश केल्याची माहिती ताजी असतानाच ही ध्वनीफित जारी करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या ही ध्वनीफित व्हॉट्सअप, टेलिग्राम यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

आयसिसकडून जारी करण्यात आलेल्या ध्वनीफितीतून चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. त्यांच्या जेवणात विष टाका. ट्रकचा वापर करा. कुंभमेळा, त्रिशूर पूरममध्ये ट्रक घुसवा. आयसिसकडून या मार्गांचा वापर जगभरात केला जात आहे,’ असे ध्वनीफितीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये लास वेगास हल्ल्याचाही उल्लेख आहे. ‘लास वेगासमध्ये आयसिसच्या एका समर्थकाने म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार करुन अनेकांना ठार केले. तुम्ही किमान रेल्वे गाड्या रुळावरुन घसरण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चाकूचा वापर करुन हल्ले करायला हवेत,’ अशी चिथावणी ध्वनीफितीतून देण्यात आली आहे.

१ ऑक्टोबर २०१७ रोजी लास वेगासमध्ये आयसिसच्या एका समर्थकाने केलेल्या गोळीबारात ५८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५४६ लोक जखमी झाले होते. एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये हा हल्ला झाला होता. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये २२ हजार लोक सहभागी झाले होते. एकाच व्यक्तीकडून हल्ले करण्याच्या पद्धतीचा सध्या आयसिसकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2017 9:16 am

Web Title: isis warns of las vegas like attack on kumbh mela thrissur pooram through audio clip
टॅग : Kumbh Mela
Next Stories
1 जेटली गुजरातवर भार, जनतेला राजीनामा मागण्याचा अधिकार: यशवंत सिन्हा
2 हिंडन विमानतळावर घुसखोरीचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात संशयित जखमी
3 ‘बुलेट ट्रेन’चे रेल्वेमंत्र्यांकडून समर्थन
Just Now!
X