08 March 2021

News Flash

‘गाझी फोर्स’चे पुनरुज्जीवन?

पाकिस्तान पोलिसांनी लाल मशिदीतील ३०० माजी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गाझी फोर्स या दहशतवादी संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याचा हे विद्यार्थी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त

| January 22, 2015 12:54 pm

पाकिस्तान पोलिसांनी लाल मशिदीतील ३०० माजी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गाझी फोर्स या दहशतवादी संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याचा हे विद्यार्थी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.
या मशिदीवर २००७मध्ये झालेल्या लष्करी कारवाईत इमाम मौलाना अब्दुल अझीझ यांचा भाऊ अब्दुल रशीद ठार झाला होता, त्यानंतर ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाली होती. यापूर्वी या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही जणांचा शोध घेतला जात आहे.
हे विद्यार्थी पाकव्याप्त काश्मीर, अटोक, स्वात आणि बुनेर येथील रहिवासी असल्याने पोलीस तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तर जे इस्लामाबाद आणि नजीकच्या परिसरात वास्तव्याला आहेत त्यांचा शोध राजधानीतील पोलीस घेत आहेत, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 12:54 pm

Web Title: islamabad police identify 198 suspected ghazi force militants
Next Stories
1 रामजन्मभूमी सुविधांसाठी स्वामींची याचिका
2 येमेन अध्यक्षांच्या समर्थनार्थ एडन विमानतळ बंद
3 नववर्षांत स्वाइन फ्लूचे ११ बळी
Just Now!
X