News Flash

दिल्लीत मोठी कारवाई: चकमकीनंतर ISIS अतिरेक्याला अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

प्रतिष्ठित व्यक्ती होत्या निशाण्यावर

घटनास्थळावरील दृश्य. (फोटो-एएनआय)

राजधानी दिल्लीत मोठी कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं शुक्रवारी मध्यरात्री घातपाती कट उधळून लावला. रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून पोलिसांनी ISIS च्या अतिरेक्याला अटक केली. अटक करण्यापूर्वी पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक अतिरेकी फरार झाला आहे.

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री आयएसआयएसचा कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करत एका अतिरेक्याला अटक केली. अतिरेक्याला अटक करण्यापूर्वी मोठी चकमक झाली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी अतिरेक्याला ताब्यात घेतलं. अबू युसूफ असं या अतिरक्याचं नाव असून, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

“धोला कुवा येथून एका आयएसआयएसच्या अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि अतिरेक्यामध्ये गोळीबार झाल्यानंतर ही त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ आयईडी बॉम्बसह शस्त्रसाठा आढळून आला असून, जप्त करण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह यांनी याविषयी माहिती दिली.

अबू युसूफ हा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवाशी असून, दिल्लीत काही साथीदारांसोबत काम करतो. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेणं सुरू केलं आहे. त्याचबरोबर त्याच्या परिसरातही पोलिसांकडून छापे टाकण्यात येत आहेत. अतिरेक्याला अटक करण्यात आल्यानंतर लोधी कॉलनी येथील विशेष पथकाच्या कार्यालयात आणण्यात आलं आहे.

अबू युसूफ याला अटक केल्यामुळे मोठा घातपाती कट उधळल्याची माहिती समोर येत आहे. या अतिरेक्याच्या निशाण्यावर दिल्लीतील काही प्रतिष्ठित व्यक्तीही होत्या, असंही वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 9:51 am

Web Title: islamic state terrorist arrested in delhi ieds seized bmh 90
Next Stories
1 सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ चार मोठ्या बँकांचे लवकरच होणार खासगीकरण; मोदी सरकारचा मोठा निर्णय
2 गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट
3 ‘फेसबुक हे नि:पक्षपाती व्यासपीठ’
Just Now!
X