अॅमेझॉनचं जंगल हा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. बाहेरील लोकांसाठी अॅमेझॉनचं गुढ आणि रहस्यानं भरलेलं जंगल नेहमीच खुणावत असतं. जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल अशी संपन्न जैवविविधता अॅमेझॉनच्या खोऱ्यात आहे. या जंगलाचा अवघा काही टक्के भागही आपण पाहिला नसेल. इथे दरदिवशी नव्यानं काहीतरी सापडतं असतं, म्हणूनच हजारो रहस्य आपल्या पोटात लपवलेलं हे जंगल अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत चाललं आहे.

अॅमेझॉनच्या जंगलात अनेक आदिवासी जमातींचं वास्तव्य आहे, बाहेरच्या जगाशी या लोकांचा कोणताही संबंध नाही. मात्र आतापर्यंत कोणालाही माहिती नसलेली आणखी एका आदिवासी जमातीचा शोध येथे लागला आहे. FUNAI या ब्राझीलमधील संस्थेनं काही व्हिडिओ फुटेज नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. या फुटेजमध्ये ही जमात आतापर्यंत कधीही पाहिली गेली नाही असा दावा त्यांनी केला आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

ड्रोनद्वारे या पाड्यातील काही दृश्य टिपली गेली आहे. हा पाडा ज्या ठिकाणी आहे तिथे अॅमेझॉनचं घनदाट वर्षावन आहे. या घनदाट झाडींतून त्यांच्यापर्यंत वाट काढत पोहोचणं जवळपास अशक्य आहे. निर्सगाचं अभेद्य कवच त्यांना कित्येक वर्षे संरक्षण पुरवत आहे. या जमातीचा शोध फार पूर्वीच लागला होता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोनद्वारे टिपलेले फुटेज प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शिकारीसाठी हे धनुष्यबाणाचा वापर करतात असंही या ड्रोनद्वारे टिपलेल्या फुटेजमध्ये दिसत होतं. अॅमेझॉनच्या नदीखोऱ्यातून फिरण्यासाठी त्यांनी झाडांचा बुंधा पोखरुन त्यापासून होडी तयार केली होती. त्यांच्या घरांचीही रचना वेगळी असल्याचं दृश्यातून दिसत होतं. या नवीन आदिवासीच्या जमातीवर अधिक संशोधन केलं जात आहे, तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी पूर्वी त्यांची माहिती उघड न केल्याचं ब्राझीलमधील FUNAI संस्थेनं म्हटलं आहे. बाहेरील जगाच्या संपर्कात नसलेल्या आदिवासी लोकांचं संरक्षण करण्याचं काम FUNAI ही एकमेव सरकारी संस्था करत आहे.