24 November 2020

News Flash

नरेंद्र मोदी हे क्रांतिकारी नेता: नेतान्याहू

मोदींचा इस्रायल दौरा एखाद्या रॉक कॉन्सर्टपेक्षा कमी नव्हता

इस्रायलचे पंतप्रधान सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

नरेंद्र मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी भारतात क्रांती घडवली अशा शब्दात इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भारतीय पंतप्रधानांचे भरभरुन कौतुक केले. ‘माझे मित्र नरेंद्र’ असा एकेरी उल्लेख करत नेतान्याहू यांनी मोदींसोबतच्या मैत्रीपूर्णसंबंधांची पोचपावतीच दिली.

इस्रायलचे पंतप्रधान सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील करारांचा यात समावेश आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

परिषदेची सुरुवात हिब्रू भाषेतून करुन मोदींनी नेतान्याहू यांचे स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्ट अप इंडिया, संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत सहमती झाली आहे. आता आगामी काळात दोन्ही देश एकमेकांच्या विकासासाठी आणि जनतेसाठी एकत्र येऊन काम करतील, अशी मी आशा करतो, असे मोदींनी सांगितले. देशात सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशा वेळी नेतान्याहू भारतात आल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल, असे त्यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून भारत आणि इस्रायलमधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलमधील अनेक कंपन्यांना मी भारतात शस्त्रास्त्र निर्मिती करायला सांगितली आहे, असे त्यांनी नमूद केले. क्षेत्रीय समस्यांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना साथ देण्याची गरज आहे, असे मोदींनी म्हटले आहे. नेतान्याहू यांनी गुजरातमध्ये नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेतान्याहू यांनी देखील मोदींचे कौतुक केले. मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी माझे ज्या पद्धतीने स्वागत केले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. भारतीय जवानांनी इस्रायलसाठी बलिदान दिले. मोदी हे इस्रायलमध्ये येणारे पहिले पंतप्रधान असून त्यांचा इस्रायल दौरा एखाद्या रॉक कॉन्सर्टपेक्षा कमी नव्हता, असे नेतान्याहू यांनी सांगितले.

भारतातही ज्यू आहेत. ज्यू लोकांना भारतात नेहमीच प्रेम आणि आदर मिळाला, यातून भारताच्या लोकशाहीचे आणि धर्मनिपक्षतेचे दर्शन घडते, असे त्यांनी सांगितले. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादाने पीडित आहेत. दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 3:22 pm

Web Title: israel pm benjamin netanyahu in india meet pm narendra modi delegate level talks 9 mou signed cyber cooperation science
Next Stories
1 अरेरे! इंदौरएवजी पोहोचला नागपूरला; ‘इंडिगो’मुळे प्रवाशाला मनस्ताप
2 न्यायपालिकेतील ‘सर्वोच्च’ वादावर पडदा; बार कौन्सिलचा दावा
3 ‘हर-हर मोदी..चा घोष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बेघर होता होता राहिले’
Just Now!
X