News Flash

सीरियातील बदलत्या परिस्थितीसाठी इस्रायल सज्ज

सीरियामधील कोणत्याही परिस्थितीसाठी आपले ज्यू राष्ट्र सिद्ध असल्याचे वक्तव्य इस्र्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहु यांनी केले आह़े

| September 2, 2013 01:02 am

सीरियामधील कोणत्याही परिस्थितीसाठी आपले ज्यू राष्ट्र सिद्ध असल्याचे वक्तव्य इस्र्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहु यांनी केले आह़े  रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याच्या संशयावरून सीरियावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेने ही कारवाई काही काळ पुढे ढकलली आह़े  अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कारवाई पुढे ढकलण्याची घोषणा केल्यानंतर इस्रायलने ही घोषणा केली आह़े
या प्रकरणात इस्रायलची भूमिका अत्यंत शांत आणि आत्मविश्वासू आहे आणि बदलणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला आम्ही सिद्ध आहोत, हे इस्रायली जनतेला पुरेपूर ठाऊक आहे, पण आपल्या शत्रूला आपली शक्ती अजमवायला खूप निमित्त आहे, हेही इस्रायली जनतेने लक्षात घ्यायला हवे, असे नेतान्याहु यांनी रविवारी साप्ताहिक बैठकीच्या सुरुवातीला सांगितल़े
सीरिया प्रकरणामध्ये आम्हाला कोणताही हस्तक्षेप करायचा नाही़  शेजारच्या देशात सुरू असणारे युद्ध हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आह़े  तरीही आम्ही सर्वतोपरी सज्जता ठेवली  आहे, असे नेतान्याहु म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:02 am

Web Title: israel ready to face changing circumstances in syria
टॅग : Israel
Next Stories
1 नेल्सन मंडेला घरी
2 बालगुन्हेगारास ३ वर्षांची शिक्षा
3 सीरियावर हल्ला होणारच
Just Now!
X