News Flash

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सीरियातील १० सैनिक ठार

अग्निबाण इस्रायलच्या भूमीत सापडला, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.

सीरियातून अग्निबाण डागण्यात आल्याचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने रविवारी सीरियात हवाई हल्ले केल्याचे त्या देशाच्या सैन्याने सांगितले. या हल्ल्यात सीरियन आणि विदेशी सैनिक मिळून १० जण ठार झाल्याची माहिती युद्ध परिस्थितीवर देखरेख करणाऱ्या एका संस्थेने दिली.

सीरियातून इस्रायलच्या ताब्यातील गोलान हाइट्समधील माऊंट हर्मन येथे शनिवारी उशिरा दोन अग्निबाण डागण्यात आले आणि एक अग्निबाण इस्रायलच्या भूमीत सापडला, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.

याचे प्रत्युत्तर म्हणून, इस्रायली लष्कराने सीरियाची दोन तोफखाना दळे, गोलान हाइट्समधील अनेक चौक्या आणि एका एसए-२ हवाई संरक्षण तोफखान्यावर हल्ले केले, असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सीरियाचे ३ सैनिक आणि विदेशी फौजांचे ७ सैनिक ठार झाल्याचे सीरियन ऑब्झव्‍‌र्हेटरी फॉर ह्य़ुमन राइट्स या संस्थेने सांगितले.

सीरियाची राजधानी दमास्कसजवळ सीरियन फौजा, इराणी फौजा आणि हिजबुल्ला लढवय्ये ज्या ठिकाणी तळ ठोकून आहेत, तेथे करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये हे सैनिक ठार झाल्याचे ब्रिटनमधील या संस्थेचे म्हणणे आहे.

सीरियात कारबॉम्ब हल्ल्यात १० ठार

  • पूर्वी आयसिसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर सीरियातील राका शहरात शनिवारी एका आत्मघातकी कारबॉम्ब हल्ल्यात १० जण ठार, तर २० जण जखमी झाले. अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
  • कारबॉम्बच्या स्फोटात ५ नागरिक आणि सीरियन डेमॉक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) या अमेरिकेची मदत असलेल्या कुर्दिश- अरब आघाडीचे पाच सैनिक मृत्युमुखी पडल्याची माहिती सीरियन ऑबझव्‍‌र्हेटरी फॉर ह्य़ुमन राइट्स (एसओएचआर) या संस्थेने दिली. एसडीएफनेच ऑक्टोबर २०१७ मध्ये आयसिसकडून राका शहर हिसकावून घेतले होते.
  • या हल्ल्यानंतर लगेच शहराच्या दुसऱ्या भागात एका बॉम्बचा स्फोट होऊन त्यात अनेक लोक जखमी झाले. हाच भाग आयसिसचा अनेकदा लक्ष्य ठरत असतो. कारबॉम्बच्या हल्ल्याचे लक्ष्य एसडीएफची एक चौकी होते, असे एसओएचआरचे संचालक रामी अब्देल रहमान यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:47 am

Web Title: israel strikes syria following rocket fire
Next Stories
1 राजकीय हेतूने थोपवलेल्या घोषणांचा सन्मान नाही – ममता बॅनर्जी
2 राम मंदिरासाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही : सुब्रह्मण्यम स्वामी
3 मोदींना कोणताही धोका नाही; आलेलं पत्र खोडसाळपणा – पोलीस आयुक्त
Just Now!
X