इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये गाझा येथील हमास या संघटनेच्या अल-अक्सा नामक टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त झाल्याचे वृत्त आहे, सोमवारी ही घटना घडली. तत्पूर्वी आणखी एका हवाई हल्ल्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, इस्लामिक जिहाद इस्रायलने केलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे एएफपी न्यूजने म्हटले आहे.


हमास ही पॅलेस्टाइनमधील सर्वात प्रमुख इस्लामी कट्टरवादी संगठना आहे. याची निर्मिती १९८७ मध्ये एका जनआंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर ही संघटना पॅलेस्टाइनमधून इस्रायलचे सैन्य हटवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हमासचा इस्रायलला कडाडून विरोध असून संपूर्ण पॅलेस्टाइन इस्लामी राष्ट्र बनवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.