09 August 2020

News Flash

विक्रम लँडर शोधल्याचा नासाचा दावा इस्रोने फेटाळला

नासा या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेचा दावा इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी फेटाळला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर शोधून काढल्याचा नासा या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेचा दावा इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी फेटाळला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने सप्टेंबरमध्येच ७ सप्टेंबरला चांद्रभूमीवर कोसळलेले लँडर त्याच महिन्यात शोधून काढले होते, त्यामुळे नासाने ते शोधून काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिवन यांनी स्पष्ट केले.

नासाने अलीकडे असा दावा केला, की चांद्रभूमीवर कोसळलेले भारताचे विक्रम लँडर आम्हीच पहिल्यांदा शोधून काढले असून त्यात चेन्नईचे अभियंता शण्मुगा सुब्रमणियन यांनी मोठी मदत केली होती. सुब्रमणियन यांनीही नासाच्या दाव्यास पुष्टी दिली होती.

इस्रोने १० सप्टेंबर रोजी म्हणजे लँडर कोसळल्यानंतर तीन दिवसांनी ते शोधून काढले होते व त्याबाबत ट्विट संदेशही जारी केला होता. विक्रम लँडर आम्हाला सापडले असून त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असे तेव्हाच्या संदेशात म्हटले होते.

नासाने काल असे म्हटले होते की, विक्रम लँडर हे चेन्नईचे अभियंता सुब्रमणियन यांच्या मदतीने शोधण्यात यश आले असून ते मूळ आघाताच्या ठिकाणापासून ७५० मीटर अंतरावर पडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 2:00 am

Web Title: isro chief rejects nasa claim of finding record lander zws 70
Next Stories
1 नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
2 पी चिदंबरम अखेर तिहार तुरूंगातून बाहेर
3 धक्कादायक : माध्यान्ह भोजनात आढळला मृत उंदीर, ९ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
Just Now!
X