News Flash

अपघातामध्ये इस्रोच्या इंजिनिअरचा मृत्यू

दुचाकी स्टेशनअरी पिकअप वाहनावर जाऊन धडकली.

(सांकेतिक छायाचित्र)

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनिअरचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. पुगझेंती (४५) असे या इंजिनिअरचे नाव आहे. ते कांचीपुरम जिल्ह्यातील कविथंदलम गावाचे रहिवासी होते. तिरुअनंतपूरममधील इस्रोच्या केंद्रामध्ये ते काम करायचे.

मंगळवारी दुपारी मोराई येथील आऊटर रिंग रोडवर झालेल्या अपघातात पुगझेंती यांचा मृत्यू झाला. त्यांची दुचाकी स्टेशनअरी पिकअप वाहनावर जाऊन धडकली. पुगझेंती यांनी हेल्मेट घालूनही त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघाताच्यावेळी पुगझेंती यांची दुचाकी प्रचंड वेगामध्ये होती असे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर पुगझेंती यांना स्थानिक नागरीक जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पिकअप व्हॅनचा ड्रायव्हर रघु विरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी रस्त्याच्याकडेला उभी केली होती असे रघुने पोलिसांना सांगितले. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:53 pm

Web Title: isro engineer dies in chennai road accident dmp 82
Next Stories
1 काँग्रेसचे आंदोलन पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थींच्याविरोधातील – पंतप्रधान
2 धक्कादायक! कोटातील रुग्णालयात महिन्याभरात १०० बालकांचा मृत्यू; राजकारण तापलं
3 पत्नी माहेरी गेली म्हणून नवऱ्याने स्वत:चे गुप्तांग कापले
Just Now!
X