News Flash

PSLV ची हाफ सेंच्युरी, पाकवर नजर ठेवण्यासाठी RISAT-2BR1 अवकाशात

सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-२ बीआर १ चे प्रक्षेपण केले.

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-२ बीआर १ चे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही ५० वी मोहीम होती.

RISAT-2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे  सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. सीमेवरील चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येईल.

आणखी वाचा- RISAT-2BR1 मुळे भारताला काय फायदा होणार समजून घ्या…

काही दिवसांपूर्वीच इस्रोने कार्टोसॅट-३ या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले होते. RISAT-2BR1 या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातले सहा उपग्रह अमेरिकेचे तर, इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. चांद्रयान-२ ही यंदाच्या वर्षातील इस्रोची सर्वात मोठी महत्वकांक्षी मोहिम होती. त्यात विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगचे अपयश वगळता ही मोहीम यशस्वी ठरली. गगनयान ही इस्रोची पुढची महत्वाची मोहिम आहे. या मिशनतंर्गत तीन भारतीयांना अवकाशात पाठवण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 3:30 pm

Web Title: isro launch risat 2br1 spy satellite from sriharikota its pslv 50th mission dmp 82
Next Stories
1 #CAB : तुम्ही ज्या शाळेत शिकलात, आम्ही त्याचे हेडमास्तर – संजय राऊत
2 RISAT-2BR1 मुळे भारताला काय फायदा होणार समजून घ्या…
3 “नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधी एकमेव पर्याय”
Just Now!
X