27 September 2020

News Flash

चांद्रयान-२ नंतर इस्त्रोचं पहिलं मिशन, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावलं ‘कार्टोसॅट-३’

पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने 'कार्टोसॅट-३' उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं

इस्त्रोने इतिहास रचला असून १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहासह अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.

१३ लघु उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-४ पी’ हे १२ लघु उपग्रह असून, एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. कार्टोसॅट-३ उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.

या खास क्षणी इस्त्रोचे प्रमुख के सिवन यावेळी श्रीहरीकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. ‘कार्टोसॅट-३’ भारताचा डोळा असल्याचं सांगितलं जात आहे. कारण याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.

‘कार्टोसॅट-३’हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात आला असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे. पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 10:15 am

Web Title: isro pslv c47 cartosat 3 nanosatellites satish dhawan space centre sriharikota sgy 87
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 मोदी लाट ओसरली, दीड वर्षात ‘ही’ राज्ये झाली भाजपामुक्त
3 विरोधकांचे बळ वाढले!
Just Now!
X