28 September 2020

News Flash

मुंबई आयआयटीची गगनभरारी, ‘प्रथम’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

प्रथम या उपग्रहामुळे जीपीएस प्रणाली सक्षम होण्यास मदत होणार आहे.

'प्रथम'सह आठ उपग्रह अवकाशात झेपावले आहेत.

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रथम या उपग्रहामुळे विद्यूत परमाणू मोजता येणार असून त्यामुळे जीपीएस प्रणाली आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे. अंतराळात झेपावलेला प्रथम हा सातवा विद्यार्थी उपग्रह आहे.
विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती. आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी २००७मध्ये प्रथम या उपग्रहाची संकल्पना मांडली. यानंतर २००९मध्ये आयआयटी मुंबई आणि इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला. या करारानुसार या उपग्रहाचे प्रक्षेपण २०१२मध्ये अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि काही तांत्रिक अडचणींमुळे उपग्रहाचे प्रक्षेपण होऊ शकले नाही. तरीही या प्रकल्पावर विद्यार्थ्यांचे काम सुरू होतेच. पुढे २०१४मध्ये सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्यात आली. या नऊ वर्षांच्या वाटचालीनंतर सोमवारी हा उपग्रह अवकाशात झेपावले.
इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी ३५ या प्रक्षेपकाने श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेप घेतली.  ३२० टनचे पीएसएलव्ही सी ३५ हे प्रक्षेपक आठ उपग्रहांसह अवकाशात झेपावले.आठ उपग्रहांमध्ये भारताचे तीन, अमेरिका आणि कॅनडाचे प्रत्येकी एक तर अल्जेरियाच्या आठ उपग्रहाचा समावेश आहे. भारताच्या तीन पैकी स्कॅटसॅट १ हा एक भारतीय उपग्रह असणार आहे. या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल. या उपग्रहांमुळे  सागरी तसेच हवामानसंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे. तर मुंबई आयआयटीचे प्रथम या १० किलोचे आणि बेंगळुरुच्या पीएसई महाविद्यालयाच्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. अल्जेरियाच्या अल्सेट १ बी, अल्सेट २ बी आणि अल्सेट १ एन या तीन उपग्रहांचाही यात समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 9:28 am

Web Title: isros pslv scatsat 1 launched from sriharikota carrying eight satellites
Next Stories
1 उरी हल्ल्यानंतर देशात ६५ च्या युद्धासारखा संताप!
2 संपूर्ण काश्मीरमध्ये संचारबंदी उठवली
3 मंगळयानाचा ग्रहण काळ कमी करण्याचे पुढील वर्षी प्रयत्न
Just Now!
X