भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘पीएसएलव्हीसी ४६’ चे यशस्वी प्रक्षेपण केले. तसेच, ‘पीएसएलव्हीसी ४६’ ने भारतीय रडार पृथ्वीची पाहणी करणारा ‘रीसॅट-२बी’ या उपग्रहास देखील ५५५ किलोमीटर उंच असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या नेऊन ठेवले.

‘पीएसएलव्हीसी’ ची ही ४८ वी भरारी आहे. तर रीसॅट-बी हा उपग्रह मालिकेतील चैाथा उपग्रह आहे. या उपग्रहाची गुप्त पाहणी, कृषि, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार आहे. या उपग्रहाचे वजन ६१५ किलो असून प्रक्षेपणानंतर केवळ १५ मिनीटातच त्याने पृथ्वीची पहिली कक्षा ओलांडली. रीसॅट-बी बरोबर सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर देखील पाठवले आहे. यामुळे संचार सेवा कायम राहिल.

या अगोदर मंळवारी इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी तिरूपती व तिरूमला मंदिरात जाऊन इस्रोच्या परंपरेनुसार भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली होती. आज या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.