तुर्कस्तानच्या इस्तंबुल विमानतळात घुसून तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमानतळावरील प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार करत सुटलेल्या दहशतवाद्याला सुरक्षा रक्षक ठार करताना या व्हिडिओमध्ये दिसून येते. सुरक्षा रक्षकाची गोळी लागल्यानंतर जमिनीवर कोसळलेला दहशतवादी स्वत:ला आत्मघाती बॉम्बस्फोटात उडवून देताना या व्हिडिओमध्ये दिसते. विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेराचे हे फुटेज असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, तुर्कस्तानच्या इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्याने हादरून निघाले आहे. तीन दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत ३६ जण ठार, तर दीडशेहून अधिक जण जखमी आहेत.
व्हिडिओ- (सावधान!, व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलीत करू शकतात.)