News Flash

इस्तंबूल स्फोटाने हादरले, दहा ठार, १५ जखमी

तुर्कीमध्ये गेल्या वर्षी दोन मोठ बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.

स्फोटानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसराची तपासणी करण्यात येते आहे.

लाखो पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेले इस्तंबूल शहर मंगळवारी स्फोटाने हादरले. स्फोटात आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला असून, १५ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. इस्तंबूलच्या मध्यवर्ती भागातच हा स्फोट झाल्याचे तेथील सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्फोटामध्ये कोणत्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, हा दहशतवादी हल्ला होता का, कोणाकडून स्फोट घडवून आणण्यात आला, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतो आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा आत्मघातकी हल्ला होता.
स्फोटानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसराची तपासणी करण्यात येते आहे. या भागामध्ये अजून कुठे स्फोटके ठेवण्यात आलेली नाहीत ना? याचाही शोध घेण्यात येतो आहे. निळ्या मशिदीजवळच हा स्फोट घडवून आणण्यात आला. या भागात पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
तुर्कीमध्ये गेल्या वर्षी दोन मोठ बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 3:51 pm

Web Title: istanbul blast 10 feared dead 15 wounded
टॅग : Terrorist Attack
Next Stories
1 जलिकट्टू, बैलगाडा शर्यतींवर बंदी कायम, केंद्राच्या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
2 डीडीसीए अहवालात व्हीआयपींची नावे टाकण्यासाठी दबाव, समिती प्रमुखांचा आरोप
3 वृद्ध सासूला सुनेने विटेने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X