प्राप्तीकर विभागाने मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये आठ ठिकाणी छापेमारी केली. याशिवाय दिल्ली व बंगळुरूमध्येही प्रत्येकी एक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने ही कारवाई विविध प्रकरणांमध्ये केली आहे.
I-T Department conducted raids at 8 locations in Srinagar, 1 each in Delhi & Bengaluru, today, in connection with different cases. https://t.co/SOIeiMVvEr
— ANI (@ANI) June 11, 2019
श्रीनगरचे उप महपौर शेख इमरान यांच्या तीन खासगी ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या छापेमारीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्राप्तीकर विभागाच्या पथकाने मंगळवारी श्रीनगरच्या पालिकेचे उप महापौर शेख इमरान यांच्या कार्यालायाचीही झाडाझडती घेतली. बोहरी कंदल व नौगामामध्ये देखील छापेमारी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 1:28 pm