News Flash

ठरलं! भारत-ब्रिटन विमानसेवा सुरु होणार ८ जानेवारीपासून

विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली माहिती

भारत आणि ब्रिटनमधील विमानांच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. ८ जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना संमती देण्यातली आहे. विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. करोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळल्याने २३ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत भारत ते ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान ८ ते २३ जानेवारी दरम्यान मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादसाठी आठवड्याला फक्त १५ उड्डाणांना संमती देण्यात आल्याचंही पुरी यांनी सांगितलं.

एकीकडे देशात करोनाचा आलेख खालावत असतानाच दुसरीकडे ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसच्या नव्या प्रकारामुळे चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण देशात आढळत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून २३ जानेवारीपासून ब्रिटन आणि भारत यांच्यातील विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आधी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती मात्र त्यानंतर ती वाढवून ७ जानेवारीपर्यंत करण्यात आली. आता ८ जानेवारीपासून भारत-ब्रिटनमधील विमान सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये २० हजारांच्या आसपास राहिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २० हजार ३५ इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर मागील २४ तासांमध्ये २३ हजार १८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या ३५ दिवसांमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिली आहे त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 9:32 pm

Web Title: it has been decided that flights between india and uk will resume from 8 jan 2021 says hardeep singh puri scj 81
Next Stories
1 ४ जानेवारीला सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरली तर… शेतकऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा
2 सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3 Video: मित्राचा मृतदेह घेऊन तो स्कुटरवरुन गल्लीबोळांमध्ये फिरत होता; घटना CCTV मध्ये कैद
Just Now!
X