News Flash

शांततेचा नोबेल न मिळणे हा माझ्यावर झालेला अन्यायच : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रतिष्ठीत शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविल्याबद्दल ट्रम्प यांनी यावेळी आश्चर्यही व्यक्त केले.

(संग्रहित छायाचित्र)

शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणं हा आपल्यावरील अन्याय असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

ट्रम्प म्हणाले, जर नोबेल समितीने निष्पक्षपणे पुरस्कार दिले असते तर आज मला अनेक गोष्टींसाठी नोबेल पुरस्कार मिळाला असता. दरम्यान, २००९ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रतिष्ठीत शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविल्याबद्दल ट्रम्प यांनी यावेळी आश्चर्यही व्यक्त केले. अमेरिकेतील एएफपी या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

आणखी वाचा : नरेंद्र मोदींचं विधान अत्यंत आक्रमक होतं : डोनाल्ड ट्रम्प

“ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आपल्याला कशासाठी देण्यात आला हे त्यांना माहिती देखील नव्हते. तुम्हाला माहिती आहे का? ओबामांच्या केवळ याच गोष्टीशी मी सहमत आहे.” अशा शब्दांत ट्रम्प यांनी ओबामांवर टीकाही केली.

दरम्यान, बराक ओबामा यांना आंतरराष्ट्रीय मुत्सदेगिरी आणि जगभरातील लोकांमध्ये सहकार्याची भावना अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या अलौकिक प्रयत्नांसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नॉर्वेच्या नोबेल समितीने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 1:13 pm

Web Title: it is an injustice not to get a nobel peace prize donald trump expresses regret aau 85
Next Stories
1 परिस्थिती गंभीर आहे पण आम्ही यावर मात करू ; ‘पीएमसी’च्या प्रमुखांनी व्यक्त केला विश्वास
2 चप्पल घातल्याने आणि शर्टचं बटण न लावल्याने टॅक्सी चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई
3 WhatsApp वरील फेक फोटोचे बळी ठरले शशी थरूर; मान्य केली चूक
Just Now!
X