राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली येथील संस्कृत अभ्यासक चमुकृष्ण शास्त्री यांच्या ‘संस्कृतकक्ष्या’ या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी इंग्रजी भाषेचा प्रभाव असाच सुरू राहिला तर भविष्यात लहान मुले गणपतीला ‘एलिफंट गॉड’ व हनुमानाला ‘मंकी गॉड’ म्हणतील अशी भीती व्यक्त केली. तर, संस्कृत जाणल्याशिवाय भारताला ओळखणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संस्कृत भाषेची महिती सांगताना म्हटले की, संस्कृत भाषेणे भारतीय समाजाला अक्षूंन्न ठेवल्याने सर्व भारतीय भाषेत समान भाव आहे. संस्कृत जाणल्याशिवाय भारताला ओळखणे कठीण आहे. संस्कृत भाषा जगातील अनेक विद्यापीठात शिकवल्या जातो, आपल्याकडेही हजारो विद्यार्थी संस्कृत भाषा निवडतात कारण संस्कृत भाषेच्या परीक्षेत जास्त गुण प्राप्त होतात. परंतु विद्यार्थी संस्कृत हा विषय केवळ दहावीपर्यंत ठेवतात अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाच्या सहा वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ट्विटरवर नुकतेच आगमन केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशिवाय सरकार्यवाह भय्याजी जोशी, सह सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, वी भागय्या, प्रचार प्रमुख अरूण कुमार आणि अनिरूद्ध देशपांडे हे आता या मायक्रो ब्लागिंग साइटवर आले आहेत.