08 August 2020

News Flash

रिलायन्सच्या ‘एजीएम’मध्ये निता अंबानींनी सांगितलं स्वतःचं स्वप्न, म्हणाल्या…

"माझं स्वप्न आहे की, भारतात...

(संग्रहित छायाचित्र)

भारताने ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करावं हे माझं स्वप्न आहे, असं रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी म्हणाल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेला रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा यावर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली.

यावेळी बोलताना निता अंबानी यांनी, भारतात ऑलिम्पिक गेम्स व्हावेत हे माझं स्वप्न आहे असं म्हटलं. निता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्याही (आयओसी) सदस्य आहेत. “भारतात ऑलिम्पिक गेम्स व्हावेत हे माझं स्वप्न आहे. भारतातील एथलिट्सना जागतिक स्तरावर चांगलं प्रदर्शन करताना मला बघायचं आहे”, असं निता अंबानी म्हणाल्या.

याशिवाय, वार्षिक सर्वसाधारण सभेला पहिल्यांदाच संबोधित करताना निता अंबानी यांनी, करोनाचं व्हॅक्सिन उपलब्ध होताच ते देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी रिलायन्स काम करणार असल्याचंही सांगितलं. “करोनाविरोधातील लढाई अजून बाकी आहे. जिओच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने, संपूर्ण देशभरात मेगा-स्केल कोविड टेस्टिंगसाठी सरकार आणि स्थानिक नगरपालिकांशी भागीदारी करणार आहे. देशभरात जास्तीत जास्त कोविड चाचण्या करता याव्यात यासाठी जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मदत घेतली जाईल आणि मी तुम्हाला आश्वासन देते की जसं करोनाचं व्हॅक्सिन उपलब्ध होईल ते डिजिटल डिस्ट्रिब्यूशन आणि सप्लाय चेनद्वारे (डिजिटल वितरण आणि पुरवठा साखळीचा वापर करून) देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचेल हे आम्ही सुनिश्चित करू”, असं त्या म्हणाल्या.

२जी मुक्ततेसाठी गुगलचे अर्थपाठबळ –

देशातील ३८ कोटी भारतीय आपल्या जिओ व्यासपीठावर नोंदविणाऱ्या रिलायन्स जिओने २जी तंत्रज्ञानयुक्त फिचर फोन वापरणाऱ्या भारतीय ग्राहकांनाही आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न जाहीर केला. याकरिता आघाडीची सर्च इंजिन गुगलचे ४.५ अब्ज डॉलरचे सहकार्य घेण्यात आल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. जिओ प्लॅटफॉर्म्समधील ७.७ टक्के हिस्सा विक्रीद्वारे गुगलच्या सहकार्याने देशातील सध्याचे ३५ कोटी २जीधारक मुक्त होऊन अद्ययावत ४जी तंत्रज्ञानाच्या कक्षेत येतील, असेही स्पष्ट करण्यात आले. रिलायन्स जिओकरिता गुगल कंपनी अ‍ॅण्ड्रॉइड आधारित संचारप्रणाली विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 9:22 am

Web Title: it is my dream to see india host olympics says nita ambani in reliance agm 2020 sas 89
Next Stories
1 CCTV Footage : अवघ्या ३० सेकंदात १० वर्षाच्या मुलाने बँकेतून चोरले १० लाख रुपये
2 ओबामा, बिल गेट्स, अ‍ॅपलची अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटरचे सीईओ म्हणतात, “आज आमच्यासाठी…”
3 करोनाचं व्हॅक्सिन देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवणार : निता अंबानी
Just Now!
X