22 November 2017

News Flash

अमेरिकेचं समाधान करणं आमचं काम नाही: पाकिस्तान

ट्रम्प यांनी पाकिस्तानला निधी रोखण्याचा इशारा दिला होता.

नवी दिल्ली | Updated: September 14, 2017 8:33 PM

Donald Trump: गेल्या महिन्यात दहशतवादाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सार्वजनिकरित्या फटकारले होते. (AP Photo/Susan Walsh, File)

दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधात गेल्या काही दिवसांपासून कटुता आली आहे. पाकिस्तानबाबत अमेरिकेने धोरण बदलल्यामुळे दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या पाकिस्तानने अमेरिकेला समाधान करण्याचे आमचं काम नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी हे गंभीर वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचे सरकार अमेरिकेबरोबरील आपल्या संबंधावर पुन्हा एकदा विचार करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी अमेरिकेबरोबरील संबंधाबाबत भाष्य केले आहे. आम्ही पुराव्यासह आणि तार्किक पद्धतीने आमचे म्हणणे मांडू. आम्ही आमच्या स्थितीबाबत विस्ताराने सांगू. पण अमेरिकेचे समाधान करणे आमचं काम नाही, असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात दहशतवादाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सार्वजनिकरित्या फटकारले होते. दहशतवाद्यांना आसरा देण्यावरून त्यांनी पाकिस्तानवर तिखट शब्दात टीका केली होती. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंधात कटुता निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

ट्रम्प यांनी पाकिस्तानला निधी रोखण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानने जर आपल्या देशातील दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली नाही तर अमेरिका त्यांना देण्यात येणारी मदत रोखेल, असे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या टीकेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. सध्या पाकिस्तानसमोर मोठे आव्हान आहे. कारण अमेरिका सातत्याने ‘गोलपोस्ट’ बदलत असल्याचे खुर्रम यांनी म्हटले. पण अमेरिकेने काय बदललं हे मात्र त्यांनी सांगण्याचे टाळले.

पाकिस्तानविरोधात भारताचे युद्धखोरीचे धोरण आहे. ते सातत्याने पाकला डिवचत आहेत. याकडे अमेरिका दुर्लक्ष करू शकत नाही. ही गंभीर स्थिती आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर अमेरिका, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकी पाकिस्तानसाठी संकट होते, असेही त्यांनी म्हटले.

First Published on September 14, 2017 8:33 pm

Web Title: it is not our duty to satisfy the us says pakistan