ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे सध्या बिहारमधील मुझफ्परपूर येथे संघाच्या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना शिस्तीचे धडे देत आहेत. यावेळी ते म्हणाले की, आपण लष्कर नाही मात्र आपली शिस्त लष्कराप्रमाणेच आहे. आपले स्वयंसेवक लष्कराच्या आधी तयार होऊ शकतात असा दावाही त्यांनी यावेळी केला. आजतकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

भागवत म्हणाले, देशाला जर आमची गरज पडल्यास तसेच आमच्या संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तत्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत. आपल्या स्वयंसेवकांचे कौतुक करातना भागवत हे ही म्हणून गेले की, सैन्याला तायरीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, आपण २ दिवसांतच तयार होऊ शकतो, कारण आमची शिस्तच तशी आहे.

मोहन भागवत गेल्या ६ फेब्रुवारीपासून मुजफ्फरपूरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी संघाच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भागवत यांनी शिस्तच आमची ओळख आहे या गोष्टीवर जोर दिला. आमची संघटना ही लष्करी किंवा निमलष्करी संघटना नाही. मात्र, ती एक कौटुंबिक संघटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले.