18 September 2020

News Flash

काॅंग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरणामुळे तिहेरी तलाक बंद करायला ५६ वर्ष लागली – अमित शाह

तीन तलाक प्रथा बंद केल्याने मुस्लीम महिलांना त्यांचा हक्क मिळाला

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन तलाक वरून विरोधकांवर टीकस्र सोडले. राजकीय फायद्यासाठी आणि मतपेटीच्या राजकारणासाठी तीन तलाक रद्द करण्यास विरोध केला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, तीन तलाक प्रथा बंद केल्याने मुस्लीम महिलांना त्यांचा हक्कच मिळाला.

यावेळी अमित शाह म्हणाले की, मोदींनी तुष्टीकरणाचे राजकारण संपवले. १६ इस्लामिक देशांनी १९२२ ते १९६३ पर्यंत वेगवेगळ्या वेळी या कुप्रथेवर बंदी आणली व ती हटवली. मात्र, काँग्रेसच्या तुष्टिकरणाच्या राजकारणामुळे या कुप्रथेस आपल्या देशातून हटवण्यासाठी ५६ वर्षे लागले.

तीन तलाक रद्द करणे जर इस्लाम विरोधी असेल तर मग इस्लामी राष्ट्रांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच या निर्णयाचा फायदा केवळ मुस्लीम महिलांनाच होणार आहे असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचं राजकारण करण्यात आलं. या व्होट बॅंक पाॅलिटिक्सला संपवण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे की इस्लामनुसार व कुराणनुसारही तिहेरी तलाक वैध नाही त्यामुळे तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली. त्यानंतर कायदा संमत करून मोदी सरकारने या वाईट कुप्रथेचा कायमस्वरूपी शेवट केल्याने शाह म्हणाले.

गृहमंत्री शाह म्हणाले की, जे राजकारण ६० च्या दशकानंतर काँग्रेसने सुरू केले व अन्य पक्षांनी देखील त्याचे अनुकरण केले. त्याचा परिणाम देशाच्या लोकशाही, समाजीक जीवन आणि गरिबांच्या उत्थानावर झाला आहे. जे मागासलेले आहेत, जे समाजातील वंचित आहेत मग ते कोणत्याही धर्माचे असतील,त्यांना वर आणले पाहिजे. आपोआपच समाज सर्वस्पर्शी व सर्वसमावेशकतेच्या मार्गावर चालेल. कोणत्याही तुष्टीकरणाशिवाय सरकाराने सर्वांचा विकास करत व सर्वसमावेशक राहत पाच वर्षे पूर्ण केली. यामुळेच देशातील कोट्यावधी जनतेने सरकारवर पुन्हा एका विश्वास टाकत, देशाला तुष्टीकरणापासून मुक्त करण्यासाठी २०१९ मध्ये बहुमत दिले.

काँग्रेसवर टीका करताना गृहमंत्री शाही हे देखील म्हणाले की, २३ एप्रिल १९८५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने शाह बानोच्या बाजूने निर्णय दिला होता. न्यायालयाने तीन तलाकला समाप्त करत म्हटले होते की, पत्नीला खर्च देणे अनिवार्य आहे आणि तलाकसाठी एक कारण द्यायला हवे. मात्र राजीव गांधी यांनी परंपरावादी मुस्लीमांच्या दबावात आणि मतांसाठी न्यायालयाचा निर्णय उलटवला होता. तसेच, त्यांनी हे देखील म्हटले की, आजही काँग्रेसला काहीच वाटत नाही, ते सांगतात की आम्ही तीन तलाकच्या बाजूने आहोत व ही प्रथा कायम रहावी. मात्र यामागचे कारण ते सांगत नाहीत. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला आहे, जेणेकरून त्यांची व्होट बँक शाबूत रहावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2019 6:28 pm

Web Title: it took 56 years to close the triple divorce due to congress msr 87
Next Stories
1 पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाची शत्रुघ्न सिन्हांकडून प्रशंसा
2 फॅसिस्ट हिंदू मोदींच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का, जगानं विचार करावा – इम्रान खान
3 देशातील सर्वात उंच व्यक्तीने योगी आदित्यनाथांकडे मागितली मदत
Just Now!
X