News Flash

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ वर किरेन रिजिजू यांची विशेष प्रतिक्रिया, म्हणाले…

आगामी टोकियो ऑलिम्पिकबाबतही केलं विधान; जाणून घ्या काय म्हणाले आहेत

पंतप्रधान मोदींनी आज टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्यादृष्टीने आपले विचार मांडले. (संग्रहीत छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरूवातीलाच आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्यादृष्टीने आपले विचार मांडले. तसेच, भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. तर, पंतप्रधान मोदींच्या आजच्या मन की बात कार्यक्रमावर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“आज पंतप्रधानांची ‘मन की बात’ हृदयस्पर्शी होती. कारण, पहिल्यांदाच भारताला असे पंतप्रधान लाभले आहेत, जे खेळाडूंना वैयक्तिकरित्या पाठिंबा देताय आणि खेळाडूंच्या उत्तम आरोग्याबाबतची प्रत्येक माहिती घेत आहेत. अशा प्रकारच्या प्रोत्साहनाची यापूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती.” असं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये केवळ प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी होण्यासाठी जात नाही आहोत, तर तिथं विजयी होण्यासाठी जात आहोत. मी ऑलिम्पिकमधील पदाकांबाबत नक्की अंदाज व्यक्त करू शकत नाही. आम्हाला खात्री आहे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये आम्ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम राहू.” असं देखील किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे.

Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी दिला मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा, म्हणाले…

तर, “मला आजही आठवतं २०१४ मध्ये मिल्खा सिंग सुरतला आले होते, आम्ही एका नाईट मॅरेथॉनचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांच्याशी जी चर्चा झाली. खेळांबद्दल जे बोलणं झालं त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मिल्खा सिंग यांचं संपूर्ण कुटुंब खेळाला समर्पित होतं. भारताचा गौरव वाढवत राहिलं आहे. मित्रानो, मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडूवृत्ती एकत्र येते, तेव्हा कुठे एखादा ‘ विजेता’ तयार होतो. आपल्या देशात बहुतेक सगळे खेळाडू लहान शहरातून, खेड्यातून येतात. आपला जो ऑलिम्पिक चमू टोकियोला जात आहे, त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे.” असं पंतप्रधान मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात बोलून दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 3:23 pm

Web Title: it was heart warming to listen to pm mann ki baat today union sports minister kiren rijiju msr 87
Next Stories
1 स्पर्धा परीक्षेतील उमेदवाराला द्यावी लागणार नाही मुलाखत; ‘या’ राज्याने घेतला निर्णय
2 “जननी जन्मभूमिश्च…”, म्हणत राष्ट्रपती झाले नतमस्तक; कॅमेऱ्यात कैद झाले ‘हे’ भावनिक क्षण
3 ….अन् क्षणात त्यानं चालत्या विमानातून उडी टाकली! जाणून घ्या नक्की काय घडलं..
Just Now!
X