News Flash

खून का बदला खून से लुंगा; ‘द ग्रेट खली’ची गर्जना

खली नॉक्सला मारहाण करत असताना ब्रॉडी स्टीलने पाठीमागून येऊन खलीच्या डोक्यात खुर्ची घातली होती

The Great Khali , wwe, WWE , injured in fight , wrestling , Loksatta , Loksatta news , Marathi , Marathi news
The Great Khali : 'खून का बदला खून से और चेअर का बदला चेअर से', असे खलीने यावेळी म्हटले.

डब्लूडब्लूईतील माजी कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’ म्हणजेच दलिप सिंग राणा याला शुक्रवारी रूग्णालयातून सोडण्यात आले. उत्तराखंडमधील काँटिनेंटल रेस्टलिंग एन्टरटेन्मेंट शो दरम्यान माइक नॉक्स आणि ब्रॉडी स्टिल यांनी खुर्चीने केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाली होता. मी याचा सूड घेईन, अशी गर्जना खलीने रूग्णालयातून सुटल्यानंतर केली. ‘खून का बदला खून से और चेअर का बदला चेअर से’, असे खलीने यावेळी म्हटले. येत्या रविवारी काँटिनेंटल रेस्टलिंग एन्टरटेन्मेंट शो चा दुसरा भाग असून त्यामध्ये खली सहभागी होणार आहे.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताचा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन हरमन सिंह आणि मेक्सिकोचा हर्नांडेज यांच्यात झालेल्या लढतीच्यावेळी हा प्रकार घडला. या सामन्यात हरमन सिंगने हर्नांडेजवर विजय मिळवला. विजयानंतर हरमन सिंह रिंगणात आनंद साजरा करत असताना अमेरिकेचा माईक नॉक्स आणि कॅनडाचा ब्रॉडी स्टील या दोघांनी रिंगणात घुसून हरमनला बेदम मारहाण केली. यानंतर या दोघांनी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या खलीला आव्हान दिले. खलीने हे आव्हान स्विकारत रिंगणात येऊन ब्रॉडी स्टील आणि माईक नॉक्सला मारहाण केली. खली नॉक्सला मारहाण करत असताना ब्रॉडी स्टीलने पाठीमागून येऊन खलीच्या डोक्यात खुर्ची घातली होती. यामध्ये खलीच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकारानंतर त्याला तातडीने उत्तराखंडच्या बृजलाल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेहराडूनला हलवण्यापूर्वी त्याच्या डोक्याला सात टाके घालण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:02 am

Web Title: it will be blood for blood and chair for chair the great khali eyes revenge
टॅग : Wrestling
Next Stories
1 पॉर्नपट पाहाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही – सर्वोच्च न्यायालय
2 तुम्हीच रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केले, सीताराम येचुरींचा भाजप नेत्यांवर आरोप
3 विषय समजून घेण्यासाठी किंवा संदर्भासाठी आली ह्युमन लायब्ररी!
Just Now!
X