27 May 2020

News Flash

‘करोना’चा हाहाकार! २४ तासांत इटलीमध्ये घेतला १००० जणांचा बळी; अमेरिकेतही १८ हजार नवे रूग्ण

इटलीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. एका दिवसांत इटलीमध्ये ९६९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आणखी २६ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या महामारीने अमेरिकेतही आपली पायामुळे खोलवर रोवण्यास सुरुवात केली असून मागील २४ तासांत १८ हजार नवे रूग्ण तेथे आढळले आहेत.

इटलीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीमध्ये करोनानं एका दिवसांत ९६९ जणांचा बळी घेतला. या यादीत इटलीनंतर इराण आणि स्पेनचा क्रमांक लागलो. एका दिवसात इराणमध्ये ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, स्पेनने ५६९ लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे इटलीमध्ये आतापर्यंत करोनाच्या प्रदुर्भावामुळे ५१ डॉक्टरांचा समावेश आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, इटलीमध्ये एका दिवसांत ९६९ नागरिकांचा बळी गेला आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण ९१३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरिकेलाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत मागील २४ तासांत १८ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. करोना विषाणूच्या चपाट्यात आतापर्यंत ९७ हजार अमेरिकन आले आहेत. न्यूयार्कमध्ये ५१२ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत १४७७ जणांचा बळी घेतला आहे.

दरम्यान, चीन व इटलीमध्ये करोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू हे वृद्धांचे झाले असल्याची चर्चा आहे. वृद्ध नागरिकांमध्ये आधीपासूनच कोणता तरी आजार असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तर, चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवले असल्याचे सध्या चित्र आहे. चीनमध्ये नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 8:00 am

Web Title: italy records almost 1000 coronavirus related deaths in one day record nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत साधला पुण्यातील हॉस्पिटल नर्सशी संवाद
2 केजरीवाल सरकारचे धोरण राबवण्याची राज्यांना सूचना
3 टाळेबंदीपूर्वी आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील देखरेख काटेकोर करा
Just Now!
X