तिरंगा पाहिला किंवा हाती घेतला तरी प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. तसाच काहीसा अभिमानास्पद प्रकार लडाखमध्ये घडला आहे. इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस जवानांनी (आयटीबीपी) प्रजासत्ताक दिनानिमित्त १७,००० फुट उंचीवर ध्वजारोहण केले. त्यांचा हो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सध्या या ठिकाणचे तापमान हे उणे २० डिग्री इतके आहे. अशा बिकट वातावरणातही त्यांच्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही. पाढऱ्या पोशाखात असलेल्या अकरा जवानांनी थेट बर्फावर संचलन केले. प्रत्येकाच्या हाती त्यांनी गन होतीच. शिवाय पहिल्या जवानाच्या हाती उंच तिरंगा होता.

प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांचे हे संचलन बघून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.