सिगारेट उत्पादक, आदरातिथ्य समूह असलेल्या आयटीसीमार्फत कॉफी डे एंटरप्राइजेसमध्ये हिस्सा खरेदी करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण, देशातील आघाडीची कॉफीपान शृंखला चालविणाऱ्या कॉफी डे एंटरप्राइजेसच्या संपादनाची कोणतीही इच्छा नसल्याचे आयटीसीने बुधवारी स्पष्ट केले आहे.
आयटीसीमध्ये हिस्सा खरेदी करण्याच्या चर्चेबाबत आयटीसी समूहाच्या प्रवक्त्याने याबाबत इन्कार केला आहे. तूर्त याबाबत काहीही हालचाल सुरू नाही, असे प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. कॉफी डे समूहावर असलेल्या कर्जाच्या बोजामुळे आयटीसी हिस्सा खरेदीमध्ये अनुत्सुक असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सुमारे ४,९७० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या कॉफी डे समूहाचे प्रवर्तक व माजी अध्यक्ष व्ही. जी. सिद्धार्थ यांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ‘माईंडट्री’मधील २२ टक्के हिस्सा विकून सिद्धार्थ बाहेर पडले होते. त्यांचा हा हिस्सा लार्सन अँड टुब्रोने खरेदी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2019 5:35 pm