भारत हा देश जगण्यासाठी असुरक्षित आहे असे म्हणणे चुकीचे आहे असे म्हणत भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. नसीरुद्दीन शाह यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत परेश रावल यांना विचारण्यात आले ज्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले आहे. नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या देशाबद्दल जे वक्तव्य केले आहे त्यावर मी भाष्य करणार नाही मात्र मला हे ठाऊक आहे की कोणीही भारत हा जगण्यासाठी असुरक्षित देश आहे असे म्हणणे चुकीचे आहे.
काही घटना घडतात, त्या घटना निषेधार्हही आहेत. त्या घडणं चुकीचेच आहे त्यांचे समर्थन होऊ शकत नाही तरीही अशा काही घटनांवरून संपूर्ण देश वास्तव्यासाठी असुरक्षित आहे असे म्हणणे गैर आहे असे परेश रावल यांनी म्हटले आहे.
BJP MP Paresh Rawal on Naseeruddin Shah’s statement that it’s unsafe to live in India: I don’t want to react to a particular statement. But it’s not right to say that India is not worth living in. I don’t agree. Incidents keep happening, but it is not right to generalise it. pic.twitter.com/VMxrOFkmLb
— ANI (@ANI) January 8, 2019
नसीरुद्दीन शाह यांनी काय म्हटले होते?
बुलंदशहर हिंसाचारावर भाष्य करताना नसीरुद्दीन शाह यांनी माणसाच्या प्राणापेक्षा गायीचा प्राण महत्त्वाचा आहे. हे वातावरण चांगले नाही, माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरले आणि विचारले की तुझा धर्म कुठला? तर त्यांना सांगता येणार नाही कारण मी त्यांना ते शिकवलेलेच नाही. जे कायदा हातात घेतात त्यांना सूट देण्यात आली आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या या वक्तव्यावर मोठी टीका झाली. तसेच अनुपम खेर यांनीही त्यांच्या या टीकेला उत्तर दिले होते. या देशात तुम्ही वायुसेनेच्या प्रमुखांबाबत अपशब्द वापरु शकता, सैनिकांवर दगडफेक केली जाते हे सगळे असताना नसीरुद्दीन शाह यांना किती स्वातंत्र्य हवं आहे? त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या पण त्या खऱ्या असतीलच असे काही नाही असे खेर यांनी म्हटले आहे. त्यापाठोपाठ आता परेश रावल यांनीही नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2019 2:43 pm