काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच सर्वात आधी भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता. ते आता अचानक शिवभक्त कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू शकत नाहीत. लोक राहुल गांधी यांचे खरे रुप काय आहे ते जाणातात असाही टोला त्यांनी लगावला. निवडणुकांच्या तोंडावर ते हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवभक्तीचे ढोंग करत आहेत. हिंदू जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणारे राहुल गांधी आणि आत्ता शिवभक्तीचा मुखवटा घातलेले राहुल गांधी एकच आहेत अशी टीकाही त्यांनी केली. तसेच त्यांचा खरा चेहरा सगळ्यांना ठाऊक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत असे म्हटले आहे. ज्यानंतर भाजपाने त्यांच्या शिवभक्तीचा मुखवटा खोटा असल्याची टीका केली आहे. तसेच राफेल कराराबाबत उत्तर देताना संबित पात्रा यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तान आणि काँग्रेस हे दोघेही हताश झाले असून मोदींना सत्तेतून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असाही आरोप केला आहे. पाकिस्तानचे मंत्री राहुल गांधींच्या ट्विटचे दाखले देतात आणि राहुल गांधी हेच भारताचे भावी पंतप्रधान आहेत, असा दावाही करतात. यावरुन पाकचे अनेक मंत्री राहुल गांधींसाठी प्रचार करत असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. तसेच हिंदूंची मते मिळवण्यासाठी ते शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करत आहेत असाही आरोप त्यांनी आता केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its the same rahul gandhi who said that theres a greater danger from hindus than let s patra on rg praying to lord shiva in amethi
First published on: 24-09-2018 at 15:18 IST