अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेताल वक्तव्य व आपल्या वादग्रस्त निर्णयांमुळे सतत चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चर्चेत असण्यामागचं कारण ठरलीये त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी २०२० साली होणाऱ्या निवडणुकीत भाग घेऊ नका, असा सल्ला इव्हाना ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.

इव्हाना या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घटस्फोटीत पत्नी आहेत. त्यांच्या मते ट्रम्प हे एक उत्तम व्यावसायिक आहेत. परंतु अमेरिकेसारख्या देशाचे प्रतिनिधित्व करता यावे इतका तगडा प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे नाही. तसेच आता त्यांचे वय ७१ वर्षे आहे. या वयात नवीन एखादी गोष्ट शिकून त्यावर प्रयोग करता येईल इतका वेळ त्यांच्याकडे आहे का? याबाबतही इव्हाना यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणात ढवळाढवळ न करता आपले उरलेले आयुष्य गरजूंची मदत करण्यात किंवा गोल्फ खेळण्यात निवांत घालवावे असा सल्ला इव्हाना यांनी दिला आहे.

इव्हाना यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर 200 अब्ज डॉलरची पोटगी मिळाली होती. ज्यानंतर त्यांच नाव चर्चेत आलं होतं. सध्या त्या आपले आत्मचरित्र लिहण्यात व्यस्त आहेत.