श्रीनगरमधील बेमिना भागातील एका मशिदीतील मौलवीच्या घरावर बुधवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन लहानग्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सकाळपासून शहरामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
बेमिना, इक्बालाबाद येथील स्थानिक मशिदीचे मौलवी इफ्तिकार अहमद पहाटे नमाजसाठी मशिदीमध्ये गेले असता अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरामध्ये घुसले. हल्लेखोरांनी अहमद यांची पत्नी नसीमा व त्यांच्या दोन लहान मुलांवर धारधार हत्याराने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अहमद घरी परतल्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या नसीमा व दोन लहान मुलांना रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. मात्र, मोहम्मद हासिम(२वर्षे) आणि आलिया(३वर्षे) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. नसीमा यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 2:24 am