News Flash

JK:जम्मू काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका महिलेचा मृत्यू

सध्यादेखील दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरुच आहे.

ceasefire violation by Pakistan in Nowshera : पहाटे ३.३८ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाल्याची माहिती समोर आली.

पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये JK पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. काश्मीरच्या नौशेरा व राजौरी सेक्टरमध्ये गुरूवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने उखळी तोफांनी मारा केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पहाटे ३.३८ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाल्याची माहिती समोर आली. या गोळीबार एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने काल रात्री १०.४० पासून स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबाराला सुरूवात केली. सध्यादेखील दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरुच आहे.

१ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा जोरदार मारा केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. यावेळी पाकने शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. पाकच्या कृतीमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती.

त्यानंतर कालच शोपिया जिल्ह्यात काश्मिरी लष्करी अधिकाऱ्याची  लग्नसमारंभातून अपहरण करून दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. दक्षिण काश्मीरमधील हेरमान भागात हा प्रकार घडला होता. लष्करी अधिकाऱ्याचा मृतदेह गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता.  लेफ्टनंट उमर फयाझ (२२) असे या जवानाचे नाव असून हत्येनंतर दहशतवाद्यांवर कठोर कारवाईसाठी स्थानिकांनी तीव्र आंदोलन केले.
लेफ्टनंट उमर फयाझ दक्षिण काश्मीरमधील कुलगामचे होते. त्यांचे मंगळवारी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते. काही काळानंतर ते मृतावस्थेत सापडले, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.   त्यांच्या अंगावर गोळ्यांच्या खुणा दिसून आल्या. उमर हे अलीकडेच लष्करात रुजू झाले होते. ते एका कौटुंबिक विवाह कार्यक्रमासाठी गेले होते. लेफ्टनंट उमर यांचा जन्म ८ जून १९९४ रोजी झाला होता. ते अखनूरमध्ये २ राजपुताना रायफल्समध्ये कार्यरत होते. २५ तारखेला ते सुट्टीवरून पुन्हा सेवेत रुजू होणार होते. शोपिया जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून ठार मारले. २०१६ मध्ये ते लष्कराच्या सेवेत आले होते. या शूर जवानाला श्रद्धांजली वाहताना लष्कराने म्हटले आहे, की त्यांच्या कुटुंबीयांच्या अवघड प्रसंगात आम्ही समवेत आहोत व दहशतवादाची कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा घडवली जाईल.  दरम्यान, गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करून जवानाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2017 10:01 am

Web Title: j k one woman dead in ceasefire violation by pakistan in nowshera
टॅग : Pakistan
Next Stories
1 ‘राम मंदिर उभारण्याची तयारी मुस्लिमांनी दाखवली होती’
2 Baba Ramdev: देशात योग आणि सीमेवर युद्ध एकाचवेळी व्हावे- रामदेव बाबा
3 शिक्षेच्या स्थगितीवर पाकिस्तानचे मौन
Just Now!
X