01 March 2021

News Flash

जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

बिनविरोध निवड

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.  भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडली होती.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अमित शाह यांचे उत्तराधिकारी म्हणून जे. पी. नड्डा यांच नाव आघाडीवर होतं. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हाच जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नड्डा यांचा एकमेव अर्ज आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ 2022पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या नाव जाहीर केल्यानंतर मावळते भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केलं.

आणखी वाचा – सामान्य कार्यकर्ता ते भाजपाध्यक्ष… नड्डा आहेत तरी कोण?

शाह म्हणाले दुसऱ्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवा –

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अध्यक्षपदाची सूत्रे अमित शाह यांच्याकडे ठेवत भाजपानं कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची नियुक्ती केली. केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात जूनमध्येच पत्र लिहिलं होतं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी विनंती शाह यांनी मोदींकडे केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 2:37 pm

Web Title: j p nadda new party chief of bjp bmh 90
Next Stories
1 काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
2 …आणि नरेंद्र मोदींनी काढली अनिल कुंबळेच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीची आठवण
3 भाजपा खासदाराने थेट सरदार पटेलांशी केली अमित शाहांची तुलना
Just Now!
X