पीएम केअर्स फंडावरुन पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक बातमी ट्विटकरुन भाजपावर निशाणा साधला. माहितीच्या अधिकारात पीएम केअर्स फंडाची माहिती देण्यास नकार असा एक संदेशही त्यांनी ट्विटरवर लिहिला. ज्यानंतर संतापलेल्या भाजपाने राहुल गांधींवर आरोप केला.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रिन्स ऑफ इनकॉम्पिटन्स आर्टिकल्सने न वाचताच काही गोष्टी शेअर केल्या आहेत. असा टोला त्यांनी लगावला. इतकंच नाही तर तुमची कारकीर्द पूर्णतः चुकीच्या बातम्या पसरवण्यात वाया घालवल्याची टीकाही त्यांनी केली. तुमच्याकडे असलेली संपत्ती तुम्ही चीनकडून घेतली आहे असाही आरोप त्यांनी केला. तुम्ही आणि तुमच्या आईने राष्ट्राचं काय हित केलं? उलट चीनकडून पैसे घेतले आता आणखी किती खालच्या पातळीवर जाल असाही प्रश्न त्यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे.