28 September 2020

News Flash

CAA हा मोठा ‘गेम’, अभिनेता जावेद जाफरीचं वक्तव्य

जावेद जाफरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादात कलाकारांनीही उडी घेतली आहे. फरहान अख्तर, सिद्धार्थ, अनुभव सिन्हा, पूजा भट, रेणुका शहाणे, परिणीती चोप्रा, हुमा कुरेशी, स्वरा भास्कर या कलाकारांनी CAA बाबत त्यांची भूमिका मांडली आहे. त्याचप्रमाणे अभिनेता जावेद जाफरीचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओत जावेद जाफरीने CAA हा मोठा गेम असल्यांच म्हटलं आहे.

जावेद जाफरीने व्हिडीओमध्ये काय म्हटलं आहे?
” तुम्ही (सरकार) हिंदू आणि मुस्लीम यांना आपसात लढवण्याचा प्रयत्न का करत आहात? हा खेळ बंद करा, त्यापेक्षा समोर येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करा. आजही आपल्या देशात लोकांच्या तीन मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा या पूर्ण होत नाहीत. एक पक्ष येतो आणि सांगतो काँग्रेस भ्रष्ट आहे. चला तुमचं म्हणणं मान्य केलं, तुम्ही काय करत आहात? तुम्ही शाळा तयार केल्या का? तुम्ही शिक्षण व्यवस्था सुधारलीत का? तुम्ही बेरोजगारी दूर कराल, आरोग्य सेवा सुरु कराल अशी अपेक्षा तुमच्याकडून होती. मात्र तुम्ही घोषणा काय करता? ‘मंदिर वहीं बनाएंगे’ का इतर काही गोष्टी नाहीत का? मंदिराच्या निर्मितीपेक्षा देशाची निर्मिती नव्याने करा, तो घडवा. CAA हा दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारा कायदा आहे. एका विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना दूर ठेवलं जातं आहे. हा कायदा म्हणजे नुसता शेम (लज्जास्पद) नाही तर एक मोठा गेम आहे.

पाहा व्हिडीओ

जावेद जाफरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. काही नेटकऱ्यांनी जावेद जाफरीच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही लोकांनी त्याचं म्हणणं मान्य केलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 2:05 pm

Web Title: jaaved jaaferi says caa is a very big game video goes viral scj 81
Next Stories
1 “महाराष्ट्रानंतर झारखंड का गेलं? याचं आत्मचिंतन करावं”
2 नरेंद्र मोदी देवापेक्षा कमी नाहीत – शिवराज सिंह चौहान
3 Video : विमानात खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रवाशांसोबत जोरदार खडाजंगी
Just Now!
X