26 October 2020

News Flash

न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी जसिंडा आर्ड्रन यांची फेरनिवड

अनिश्चितता आणि चिंता यांनी भरलेले वातावरण असताना ही निवडणूक झाली

न्यूझीलंडमधील निवडणुकीत पंतप्रधान जसिंडा आडर्र्न यांनी विजय मिळवल्यानंतर शनिवारी ऑकलंड येथे कार्यकर्त्यांचे आभार मानले.

ऑकलंड : न्यूझीलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जसिंडा आर्ड्रन दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत त्यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. करोना संसर्ग रोखण्यात मिळवलेले यश हे आर्ड्रन यांच्या विजयाचे प्रमुख कारण मानले जाते.

निवडणुकीत पराभव झाल्यास पक्षनेतेपदाचा त्याग करण्याची घोषणा जसिंडा आर्ड्रन यांनी केली होती, पण त्यांच्या मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. र्आड्रन यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाला ४९ टक्के मते मिळाली, त्यांचा मित्रपक्ष- ग्रीन पार्टीला ७.६ टक्के, तर मुख्य प्रतिस्पर्धी पुराणमतवादी नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली.

मजूर पक्षाने संसदेत बहुमत मिळवले आहे. न्यूझीलंडने प्रमाणात्मक मतदान प्रणाली स्वीकारल्यानंतर २४ वर्षांत असे स्पष्ट बहुमत कधीच एका पक्षाला मिळाले नव्हते. पूर्वी राजकीय आघाडय़ा तयार करणे भाग पडत असे, पण यावेळी आर्ड्रन यांच्या मजूर पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले आहे.

ऑकलंड येथे शेकडो समर्थकांपुढे बोलताना आर्ड्रन म्हणाल्या, ‘‘नागरिकांनी आमच्या पक्षाला गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात एवढे मोठे यश दिले आहे. ही सामान्य निवडणूक नव्हती.

अनिश्चितता आणि चिंता यांनी भरलेले वातावरण असताना ही निवडणूक झाली. त्यामुळे आता सध्याच्या निराशाजनक परिस्थितीतून मार्ग काढण्याचे उपाय आम्हाला शोधावे लागतील. आपण ध्रुवीकरण झालेल्या जगात राहात आहोत. या जगात बहुसंख्य लोकांनी दुसऱ्यांची मते ऐकून घेण्याची क्षमता गमावली आहे. परंतु या निवडणुकीत न्यूझीलंडच्या नागरिकांनी आपण तशा लोकांपैकी नाही, हे सिद्ध केले आहे.’’

..म्हणून लोकप्रियता वाढली! 

करोनाच्या प्रतिबंधासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांना यश आले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली, असे मानले जाते. आता ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात लोकांना मुखपट्टी आणि अंतर नियमासह कोणतेही निर्बंध पाळण्याची गरज उरलेली नाही. पंतप्रधान आर्ड्रन यांनी राबवलेल्या उपाययोजनांमुळे तेथील साथ पूर्णपणे आटोक्यात आली आहे. प्रचाराच्या वेळी आडर्र्न यांचे एखाद्या रॉकस्टारसारखे स्वागत झाले. अनेकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतल्या होत्या.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 3:30 am

Web Title: jacinda ardern wins landslide re election in new zealand zws 70
Next Stories
1 ओडिशातील सेवाभावी संस्थेचे सर्व १९ विद्यार्थी नीटच्या गुणवत्ता यादीत
2 पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्राच्या वादातून शिक्षकाचा शिरच्छेद
3 समान नागरी कायद्याविरोधात जनमत तयार करणार -जिलानी
Just Now!
X