19 September 2019

News Flash

संयुक्त राष्ट्रांत योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव करणार

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी योग दिन सुरू करण्यात आला होता

आंतरराष्ट्रीय योगदिन पुढील महिन्यात २१ जूनला साजरा होत असून संयुक्त राष्ट्रातील कार्यक्रमात इशा फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव नेतृत्व करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी योग दिन सुरू करण्यात आला होता, त्याचा प्रस्ताव भारताने मांडला व तो संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला होता. भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाने सांगितले की, संयुक्त राष्ट्रात योगदिनाचा जो कार्यक्रम होणार आहे त्यात जग्गी वासुदेव नेतृत्व करतील. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन गेल्या वर्षी वाजतगाजत साजरा झाला होता त्यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून व आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर तसेच अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या तुलसी गॅबार्ड सहभागी झाल्या होत्या.

First Published on May 29, 2016 12:05 am

Web Title: jaggi vasudev
टॅग Yoga