News Flash

आली ‘जग्वार लॅन्ड रोव्हर’ची नवी स्पोर्ट्स कार..

टाटा मोटार्स मालकीच्या जग्वार लॅन्ड रोव्हर(जेएलआर) कार उत्पादन कंपनीने आपली नवी 'जग्वार एफ टाईप' अत्याधुनिक स्पोर्ट्स कार बाजारात दाखल केली आहे. या कारची किंमत १.६१

| July 8, 2013 02:58 am

टाटा मोटार्स मालकीच्या जग्वार लॅन्ड रोव्हर(जेएलआर) कार उत्पादन कंपनीने आपली नवी ‘जग्वार एफ टाईप’ अत्याधुनिक स्पोर्ट्स कार बाजारात दाखल केली आहे. या कारची किंमत १.६१ कोटी रुपये इतकी असणार आहे. तसेच जग्वार एफ टाईप कारचे दोन प्रकार बाजारात दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार ‘एफ टाईफ व्ही८एस’ पाच लीटर पेट्रोल इंजिन कारची किंमत १.६१ कोटी तर, ‘एफ टाईप एस व्ही६’ तीन लीटर पेट्रोल इंजिन कार १.३७ कोटी रुपये असणार आहे.
“एफ टाईप कार बाजारात दाखल करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक कारनिर्मिती करणे ही जग्वार कंपनीची प्राथमिकता आणि खास गोष्ट आहे. या कारमुळे भारतात जग्वारचे ‘ब्रँड अपील’मध्ये वाढ होईल” असे जग्वार लॅन्ड रोव्हर इंडियाचे उपाध्यक्ष रोहीत सुरी यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 2:58 am

Web Title: jaguar f type sports car launched in india at rs 1 61 crore
टॅग : Auto News,Tata Motors
Next Stories
1 ‘शांतीस्थळा’वर हल्ला, बिहारमध्ये महाबोधी मंदिराच्या परिसरात ९ बॉम्बस्फोट, दोन जखमी
2 बिहार-बोधगया परिसरात नऊ बॉम्बस्फोट; पाच जखमी
3 गोव्यातील घोटाळ्यांची चौकशी केल्यास निम्मे अधिकारी तुरुंगात, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गौप्यस्फोट
Just Now!
X