News Flash

जैश ए मोहम्मदचे देशात अस्तित्त्वच नाही, पाकच्या उलट्या बोंबा

पाकिस्तान लष्कराने हा नवा दावा केला आहे

संग्रहित छायाचित्र

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने उलट्या बोंबा मारत जैश ए मोहम्मद ही संघटना आमच्या देशात अस्तित्त्वातच नाही असं म्हटलं आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर हा पाकिस्तानात आजारी असल्याचं पाकिस्तानच्याच परराष्ट्र मंत्र्यांनी चार दिवसांपूर्वी मान्य केलं. आता पाकिस्तानी लष्कर मात्र ही दहशतवादी संघटना आमच्या देशात अस्तित्त्वातच नाही असं म्हणते आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमुद कुरेशी यांनी चारच दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत या संघटनेचा म्होरक्या मसुद अझर आजारी असल्याचं सांगितलं होतं. मसुद अझर मारला गेल्याचे वृत्त जेव्हा काही प्रसारमाध्यमांमध्ये आले होते तेव्हा पाकिस्तानचे सांस्कृतिक मंत्री फैय्याज उल हसन यांनीही मसुद जिवंत असल्याची माहिती दिली होती.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावर दबाव वाढतो आहे. हाफिज सईद या दहशतवाद्याच्या दोन संघटनांवरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. पाकिस्तान भारताच्या कुरापती काढण्याचे धोरण थांबवत नसल्यानेच पुलवामा येथील हल्ल्यानंतर हवाई हल्ला करून भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. तरीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि भ्याड हल्ले सुरुच आहेत. आता पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने जैश ए मोहम्मद ही संघटनाच पाकिस्तानात अस्तित्त्वातच नाही असा दावा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 2:38 pm

Web Title: jaish dosent exist in our country says pak army
Next Stories
1 ‘राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास’
2 फेसबुकवर भाजपा प्रसन्न! एका महिन्यात जाहिरातींवर २. ३७ कोटींचा खर्च
3 पाकची मुजोरी, ISI एजंटची भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना धमकी
Just Now!
X