19 September 2020

News Flash

दिल्लीत ‘जैश- ए- मोहम्मद’चा दहशतवादी सज्जाद खानला अटक

सज्जाद खानला झालेली अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे. 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. सज्जाद खानला झालेली अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सिर अहमद खान याला सुरक्षा दलांनी ११ मार्च रोजी त्राल येथील चकमकीत कंठस्नान घातले होते. मुदस्सिर हा पुलवामा येथील त्रालच्या मिर मोहल्ल्यात राहत होता. २०१७ मध्ये त्याने जैश- ए – मोहम्मदमध्ये शिरकाव केला होता. त्यानेच स्फोटातील गाडी आणि स्फोटके यांची जमवाजमव केली होती.

दिल्लीतील सज्जाद खान हा मुदस्सिरच्या संपर्कात असल्याचे सुरक्षा दलांच्या तपासातून उघड झाले होते. यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सज्जाद खानला लाल किल्ला परिसरातून गुरुवारी रात्री अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सज्जादची कसून चौकशी करत आहेत.

सज्जाद खान याचे दोन भाऊ देखील दहशतवादी संघटनेतच असल्याचे समजते. त्याचे दोघेही भाऊ हे ‘जैश’मध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले.सज्जाद देखील मूळचा काश्मीरचा असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 11:49 am

Web Title: jaish e mohammad terrorist sajjad khan arrested delhi police close aide of mudassir
Next Stories
1 सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे – नरेंद्र मोदी
2 ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’, काँग्रेस नेत्याशी संबंध असल्याच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचं वादग्रस्त उत्तर
3 शिवस्मारकाच्या कामात अनियमतता: सार्वजनिक बांधकाम विभाग
Just Now!
X