News Flash

पंतप्रधान कार्यालय, लाल किल्ला निशाण्यावर

दिल्लीत अलर्ट; जैश, लष्करचे १२ दहशतवादी घुसले?

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दिल्लीत अलर्ट; जैश, लष्करचे १२ दहशतवादी घुसले?

जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे १२ दहशतवादी दिल्लीत घुसले असून मोठा घातपात घडवून आणण्याचा त्यांचा कट आहे. पंतप्रधान कार्यालय आणि लाल किल्ला या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर हा घातपात घडविण्यात येणार असल्याने दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

येत्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीला अधिक धोका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे दिल्लीत मोठा घातपात घडवून आणावयाचा असून त्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटना कामाला लागल्या आहेत.

घातपात घडवून आणण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे सात तर लष्कर-ए-तोयबाचे पाच दहशतवादी दिल्लीत घुसल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएस पथक आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी नोइडामध्ये जमात-उल-मुजाहिद्दीनचे दोन संशयित दहशतवादी पकडले होते. या संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. दिल्लीत घुसलेल्या १२ दहशतवाद्यांना आयएसआयकडून पाठबळ मिळत आहे. त्याबाबत दिल्ली पोलिसांना गुप्तचर यंत्रण आणि रॉने माहिती दिली आहे.

या पाश्र्वभूमीवर केवळ दिल्ली पोलिसांनाच नव्हेत तर देशातील सर्व गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय आणि लाल किल्ला येथे दहशतवादी बॉम्ब ठेवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच यापैकी कोणाला तरी अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 1:20 am

Web Title: jaish e mohammed lashkar etaiba the red fort
Next Stories
1 शरीफ, भुत्तो, हाफीज सईद यांना मतदारांनी नाकारले
2 उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
3 दिल्लीत तीन चिमुरडय़ा मुलींचा उपासमारीमुळे मृत्यू
Just Now!
X