पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या भाऊ इब्राहिम अझहर दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत 15 दहशतवाद्यांनाही पाहिले असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, या दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास प्रशिक्षण दिले जात आहे.
अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट असल्याचे सांगत सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला होता. त्यानंतर आज (शनिवारी) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 15 दहशतवाद्यांसह इब्राहिम अझहर दिसल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, इब्राहिम हा मरकज, सनान बिन सलमा, तरनब फार्म, पेशावर आणि खैबर पख्तूनख्वातील विविध दशतवादी तळांवर या दहशतवाद्यांसोबत दिसला आहे. दरम्यान, या दहसतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी तयार करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथील जमरूदमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Sources: Reports of Ibrahim Azhar (JeM chief Masood Azhar’s brother) resurfacing in PoK came alongside further intercepts that confirmed that a group of 15 trained JeM cadres had reached JeM camps in Markaz, Sanan Bin Salma, Tarnab Farm, Peshawar, Khyber Pakhtunkhwa… (1/2)
— ANI (@ANI) August 3, 2019
दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करू शकतात माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती. त्यानंतर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. तसेच सर्व पर्यटक आणि भाविकांना जम्मू काश्मीरमधून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले होते. नियोजित वेळेनुसार ही यात्रा 15 ऑगस्ट रोजी संपणार होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ही यात्रा नियोजित वेळेपूर्वी रद्द करण्यात आली. तसेच यानंतर शनिवारी माछिल यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 4:55 pm