News Flash

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा

घटनास्थळावरून मृतदेहासह शस्त्रसाठा ताब्यात

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात चकमक झाली होती.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील क्रलपोरा चेकपोरा भागास वेढा देऊन शोध मोहीम राबवली जात होती. दरम्यान या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर जवानांनी केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. घटनास्थळावरून त्याचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आला असून, त्याची ओळख देखील पटली आहे. झारार असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानी नागरिक असुन त्याचा जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. याशिवाय चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी शस्त्र देखील जप्त केली आहेत. ही मोहीम यशस्वी ठरली असुन यामध्ये कोणत्याही जवानात हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 7:01 pm

Web Title: jaish e mohammed militant was killed in an encounter msr87
Next Stories
1 देशात सर्वाधिक साडेतीन हजार स्टार्टअप महाराष्ट्रात
2 ‘मी महाराष्ट्राचीच’, प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर
3 काँग्रेसची दिल्ली, तेलंगण प्रदेश समिती बरखास्त
Just Now!
X