News Flash

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून कारवाई

संग्रहित (PTI)

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला असून जैश-ए-मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून सध्या या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे.

एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, “अटकेची कारवाई करण्यासाठी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिलेनियम पार्कजवळ सापळा रचण्यात आला होता. जम्मू काश्मीरचे निवासी असणाऱ्या या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे दोन अॅटोमॅटिक पिस्तूल आणि १० जिवंत काडतूसं सापडली आहेत”.

अटक करण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. अब्दुल लतिफ मीर आणि मोहम्मद अशरफ खतना अशी या दोघांची नावे आहेत. अब्दुलचं वय २२ असून तो बारामुल्लाचा रहिवासी आहे तर २० वर्षीय अशरफ कुपवारामध्ये वास्तव्यास आहे. ऑगस्ट महिन्यातही दिल्ली पोलिसांनी आयएसच्या दहशतवाद्याला अटक करत हल्ल्याचा कट उधळला होता. पोलिसांनी यावेळी १३ किलो आईडी जप्त केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 8:57 am

Web Title: jaish e mohammed terrorists arrested in delhi sgy 87
Next Stories
1 भारतीय गुप्तहेर म्हणून अटक, २८ वर्षांनी पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर कुटुंबाने साजरी केली दिवाळी
2 सातव्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमारांवर ‘पीके’चा निशाणा, म्हणाले…
3 भाजापाचा आमदार निवडून आल्यास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देणार इनोव्हा
Just Now!
X