20 January 2021

News Flash

मुलाचं आपल्यापेक्षा आजीवर जास्त प्रेम ! संतापून आईने केली आपल्याच मुलाची हत्या

हत्येनंतर दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिकात्मक छायाचित्र

आपला मुलगा आपल्यापेक्षा आजीवर जास्त प्रेम करतो या भीतीमधून जालंधरमधील एका महिलेने आपल्याच सहा वर्षाच्या मुलाची किचनमधील सुऱ्याने भोसकून हत्या केली आहे. कुलविंदर कौर असं या महिलेचं नाव असून जालंधरमधील शाहकोट भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर कुलविंदरने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फोल ठरला, सध्या तिच्यावर नाकोदार येखील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

३० वर्षीय कुलविंदर कौरचा पती इटलीत कामाला आहे. कुलविंदर आपला मुलगा आणि सासुबाई यांच्यासह जालंधरमधील घरी राहत होती. पण आपला मुलगा आपल्यापेक्षा जास्त आजीसोबत वेळ घालवतो यावरुन कुलविंदर आणि तिची सासू चरणजीत कौर यांच्यात सारखे वाद व्हायचे. यामुळे कुलविंदरच्या मनात आपल्या सासुबद्दल इर्ष्या निर्माण झाली होती.

सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर कुलविंदरचा मुलगा आपल्या आजी-आजोबांपाशी गेला. रागावलेल्या कुलविंदरने आपल्या मुलाला खोलीमध्ये नेऊन किचनमधील सुऱ्याने दोनवेळा त्यावर वार केले. नातवाचा किंकाळण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजी-आजोबा धावत खोलीमध्ये गेले असता त्यांना आपला सहा वर्षीय नातू जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर कुलविंदरने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलिसांनी कुलविंदर कौर हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 6:20 pm

Web Title: jalandhar mother murders 6 year old for loving grandmother more than her psd 91
Next Stories
1 करोना आहे की, नाही? २० मिनिटात कळणार; आयआयटीतील संशोधकांनी तयार केली किट
2 अंधश्रद्धेचा कहर… बिहारमधील महिला नदीकाठी जाऊन करतायत ‘करोना देवी’ची पूजा
3 करोना रुग्णांची संख्या वाढल्यानं ‘या’ राज्यानं केल्या सीमा बंद
Just Now!
X