कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर असताना जलीस अन्सारी मुंबईतून फरार झाला होता. त्याला आता पोलिसांनी कानपूरमधून अटक केली आहे. 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब असेही संबोधत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.

अन्सारी हा मागील काही महिन्यांपासून अजमेरच्या तुरुंगात होता. त्यानंतर तो जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता. अन्सारी आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोमीनपुरा येथे राहणारा आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजस्थानातील अजमेर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून अन्सारी 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला. मात्र त्याला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.