News Flash

हाफिज सईदवर परदेश प्रवासास निर्बंध

भारताने हाफिज विरोधात ठोस पुरावे द्यावेत अशी मागणी पाकिस्तानने केली आहे

हाफिज सईदच्या मेहुण्याकडे जमात-उद-दवाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान सरकारने परदेश प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर भारताने हाफिज सईद विरोधात ठोस पुरावे सादर करण्याचे आवाहन केले आहे. सईदच्या कारवायांचा दाखला देऊन भारत पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पाकिस्तानने म्हटले. हाफिज सईदबरोबर इतर ३७ जणांनाही परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. या आठवड्यामध्ये हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भारताने हाफिजविरोधात अनेक पुरावे दिले आहेत परंतु पाकिस्तानने त्याच्याविरोधात ठोस पावले उचलली नाहीत.

यापूर्वी हाफिझ सईद याला अटकेतून मुक्त करण्याच्या आदेशास आव्हान देणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी लाहोर उच्च न्यायालयाने सईदला नजर कैदेतून मुक्त करण्याचा दिलेला निकाल उचलून धरला आहे. सईदच्या सुटकेच्या आदेशाला फेडरल व पंजाब सरकारने गेल्या वर्षी आव्हान दिले होते पण काही तांत्रिक कारणास्तव त्याची सुनावणी होऊ शकली नव्हती. अपिल रद्दबातल ठरवण्यात येत आहेत असे न्या. नासीर उल मुल्क यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीशांच्या पीठापुढे सुनावणी झाली. सईद हा ६० वर्षे वयाचा असून तो लष्कर-ए-तय्यबा या प्रतिबंधित संघटनेचा संस्थापक आहे. मुंबई हल्ल्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये त्याला नजरकैदेत टाकण्यात आले होते. तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रांनी त्याच्या लष्कर-ए-तय्यबा संघटनेला बेकायदेशीर ठरवले आहे. नजरकैदेला आव्हान देणारी याचिका त्याने लाहोर उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर गेल्यावर्षी दोन जूनला न्यायालयाने असे सांगितले होते की, पंजाब व फेडरल सरकार यांना हाफिझ सईद याच्या विरोधात पुरावे देता आलेले नाहीत. भारत व आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे फेडरल व पंजाब सरकारने सईद याच्या सुटकेच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २००८ मधील मुंबई हल्ल्यांशी जमात उद् दावाचा प्रमुख हाफिझ सईद याचा संबंध असल्याचे पुरावे देण्यात अधिकाऱ्यांना अपयश आले असे न्यायालयाने आदेशात म्हटल्याचे सईदचे वकील ए.के.डोगर यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 5:13 pm

Web Title: jamat ud dawa hafiz saeed mumbai attack mastermind
Next Stories
1 VIDEO: चिमुरडीसमोर मृत्यूही हरला!; १५ तासांनंतरही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत सापडली!
2 BSF jawan TejBahadur : जेवणाची व्यथा मांडणारा जवान अटकेत?, स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही फेटाळला
3 माणुसकी हरवली ! अपघात झाल्यानंतर मदतीऐवजी लोक काढत होते युवकाचे फोटो
Just Now!
X