पाकिस्तानने अगोदरच्या बातम्यांनुसार जमात उद दवा या मुंबई हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवादी संघटनेवर बंदी घातलेली नाही तर काही जुजबी कारवाई या संघटनेवर सुरू केली आहे ,असे सांगण्यात आले.
जमात उद दावा या संघटनेने नोव्हेंबर २००८ मध्ये भारतात हल्ला केला होता त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्या संघटनेवर बंदी घातली होती. त्यानुसार बँक खाते सील करणे, शस्त्रास्त्र नियंत्रण व प्रवास बंदी या कारवाईची अपेक्षा होती  त्याप्रमाणे आम्ही केले आहे, संघटनेवर बंदी घातलेली नाही असे सरकारी सूत्रांनी सांगितले.